कारणे
व महत्त्वाच्या घटना
१.बॉम्बे
सरकारला महाराष्ट्रात क्लाईव्हने बंगालमध्ये स्थापन केलेल्या दुहेरी
शासनव्यवस्थेची स्थापन करण्याची इच्छा होती. पेशवेपदासाठीच्या सत्ता संघर्षाने त्यांना संधी प्राप्त झाली.
२.माधवरावांच्या
मृत्यूनंतरचा सत्ता संघर्ष: पेशवेपदाची इच्छा असलेल्या रघुनाथरावांनी
(माधवरावांचा काका) पेशवा नारायणराव (माधवरावांचा भाऊ) याचा खून
घडवून आणला व स्वत:स पेशवा घोषित केले. तेव्हा मराठा दरबारातील नाना फडणीस, महादजी शिंदे, सखाराम बापू वगैरे बारा व्यक्तींनी
राघोबाच्या विरोधात बारभाईंचे राजकारण केले. त्यांनी राघोबाला पदच्युत
केले व नारायणरावांच्या नुकत्याच झालेल्या मुलाला सवाई माधवराव असे
नाव देऊन त्याला पेशवा बनविले व त्याच्या वतीने हे बाराजण राज्यकारभार
पाहू लागले.
३.राघोबाने गेलेले पेशवेपद मिळविण्यासाठी
बॉम्बे प्रेसिडन्सीशी ‘सुरतचा
तह’
(१६ मार्च,
१७७५) रोजी केला. त्यामुळे युद्धास
सुरूवात झाली.
४. मात्र सुरतचा तह कलकत्त्याच्या गव्हर्नर-जनरलला पसंद पडला
नाही. त्याने बॉम्बे सरकारला मराठ्यांची नवीन तह करायला सांगितले.
दीर्घ चर्चेनंतर बॉम्बे सरकारने पुणे दरबारातील शासक गटाशी मार्च
१७७६ मध्ये ‘पुरंदरचा तह’ केला. या तहामुळे युद्ध तात्पुरते
थांबले. या तहाद्वारे राघोबाला मराठ्यांच्या स्वाधीन
करायचे ठरले व त्याने केलेले पूर्वीचे
तह रद्द करण्यात आले.
५
मात्र
हा तह मुंबईच्या इंग्रजांना नुकसानकारक वाटला. तसेच कंपनीच्या संचालकांनाही तो पसंत पडला नाही. अमेरिकन वसाहती गमावल्याने
आता इंग्रजांनी पुन्हा राघोबाची बाजू घेऊन मराठ्यांशी युद्ध सुरू केले. पण
पुण्याकडे राघोबाला घेऊन येणाऱ्या इंग्रजांचा महादजी शिंदेंनी तळेगाव
येथे पराभव
करून त्यांना ‘तळेगावचा तह’ (१७७९)
मान्य करावयास लावला.
६. हा तह इंग्रजांनी अमान्य केल्यावर त्यांचा निर्णायक पराभव
करण्यासाठी नाना फडणीसाने पेशवे,
नागपूरकर भोसले, हैदर
अली व निझाम यांचा ‘चतुःसंघ’ इंग्रजांविरूद्ध उभा केला. मात्र धुर्त
इंग्रजांनी निझाम व भोसल्यांना
फितविले. तसेच गोद्दार्ड
याच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याहून मोठे
सैन्य मराठ्यांविरूद्ध पाठविले.
दोन
वर्षे युद्ध असेच चालू राहिले. इंग्रजांनी महादजींकरवी शांततेचा प्रस्ताव मांडला. हैदर न विचारता मराठ्यांनी ‘साल्बाईचा
तह’ करून ७-८ वर्षे
चाललेले युद्ध संपुष्टात आणले.
●
साल्बाईचा तह, १७
मे, १७८२
• साल्बाई या ग्वाल्हेरपासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी
महादजी शिंदे (पेशव्यांच्या वतीने) व इंग्रज यांमध्ये हा तह १७ मे, १७८२
रोजी करण्यात आला व पहिले इंग्रजमराठा युद्ध थांबले. या तहाच्या
प्रमुख अटी पुढीलप्रमाणे होत्याः
१)साष्टी,
भडोच,
मुंबई इंग्रजांकडेच राहतील, तर
पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेली ठाणी मराठ्यांना परत केली जातील.
२)इंग्रजांनी राघोबाची बाजू घेऊ नये.
३)इंग्रजांना त्याच्या व्यापारी सवलती
पुन्हा प्राप्त होतील.
४)दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या दोस्त
राज्यांवर हल्ला करायचा नाही.तसेच पेशव्यांनी इतर युरोपीयन शक्तींना मदत करायची
नाही.
●
महत्व
• हा तह इंग्रजांसाठी खूप महत्वाचा ठरला. खरे तर, तो
इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराच्या इतिहासात एक महत्वाचे वळण (turning point) ठरला.
या तहामुळे इंग्रजांची मराठ्यांशी २० वर्षे शांतता प्रस्थापित
झाल्याने या काळात त्यांनी आपली शक्ती
वाढविली व मराठ्यांव्यतिरिक्त इतर
शबूंचा एक-एक करून पराभव केला. नाना फडणीसाला हा तह हैदरच्या
मान्यतेशिवाय करायचा नव्हता. त्यामुळे महादजी व नाना यांच्या
फूट पडली, तसेच मराठे व हैदर यांचे संबंधही
बिघडले.
No comments:
Post a Comment